स्वयंसिद्धा महिला मंडळ हा महिलांचा आधारवड - आ.अभिमन्यू पवार

__ लातूर /प्रतिनिधी : सौ स्मिताताई परचुरे या सामान्य कार्यकर्त्यांच्या आधारवड आहेत . प्रसिद्धीपासून दूर राहत त्यांचे कार्य सुरू असते . ताईनी उभारलेले स्वयंसिद्धा महिला मंडळ हा स्त्रियांचा आधारवड बनला असल्याचे मत आ.अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले . स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या रजत जयंती वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ.पवार बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हर्षदा गोरे तर व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सौ स्मिताताई परचुरे , उपाध्यक्षा प्रेरणाताई रेड्डी , सचिव सुनिता नावंदर , संचालिका शुभदा रेड्डी , सौ वेदवाणी सगर , बालकाश्रमाच्या प्रमुख उमाताई व्यास यांची उपस्थिती होती . यावेळी बोलताना आ.अभिमन्यू पवार म्हणाले की , लहानपणापासून परचुरे काकूना पाहत आलो आहे . भाजपातील कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी आजवर केलेले आहे . आतापर्यंत त्यांनी मोडणारे ८ हजार संसार जोडण्याचे काम यशस्वीपणे केले आहे . सौ. स्मिताताईनी एवढ्या मोठ्या संख्येने संसार उभे केले. सरकारच्या आधारावर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी हे काम करून दाखवले .संसार जोडण्याच्या कामात त्यांना ८० टक्के यश मिळाले आहे . याच बाबी वकिलांकडे गेल्या असत्या तर ८ टक्के संसारही पुन्हा उभे राह शकले नसते ,असे आ. अभिमन्यू पवार म्हणाले प्रसिद्धीपासून दूर राहत त्यांचे हे काम सुरू आहे . या संस्थेत महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम केले जाते . रोजगार निर्मिती केली जात आहे. या कार्यात हवी ती मदत करण्यास आपण तयार आहोत . मी या कुटुंबातील सदस्य आहे. हक्काने सांगा,शक्य ती मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.अध्यक्षीय समारोपात डॉ. हर्षदाताई गोरे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली . स्मिताताईनी कणखर व निर्भय होत महिलांना आधार दिला . त्यांच्यासारख्या मंडळींचा सहवास मिळण्यासही भाग्य लागते.या संस्थेत गुणी विद्यार्थी आहेत . त्यांच्यात विविध कलागुण आहेत. या विद्यार्थ्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे अशी सूचना त्यांनी केली . स्मिताताईना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळालेला आहे . आता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली . प्रास्ताविक करताना सौ. स्मिताताई परचुरे म्हणाल्या • ; - की , डॉ. अशोकराव कुकडे काका आणि डॉ. ज्योत्स्नाताई कुकडे काकू यांच्या मार्गदर्शनात आमची वाटचाल सुरू आहे . आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतून संस्थेचे काम सुरू आहे . १९९३ साली झालेल्या भूकंपानंतर महिला आणि मुलींची अवस्था पाह्न संस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मागच्या २४ वर्षात संस्थेने प्रामाणिकपणे काम केले . ८ हजाराहून अधिक मोडणारे संसार जोडले. संस्थेत दाखल झालेल्या महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्याचे काम संस्था करत आहे . आता संस्थेने पापड उद्योग सुरू केला आहे . संस्थेच्या वाटचालीसाठी अनेकांची मदत होते . यापुढेही मदत लागणारच ७ आहे असे सांगत त्यांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले . संस्थेतील विद्यार्थीनींनी नृत्य , पोवाडा यासारखे कलाप्रकार सादर केले . सौ स्मिताताई परचुरे , सुनिताताई नावंदर यांनी उपस्थितांचे स्वागत केले . मीरा भोसले व विद्याताई कुलकर्णी या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचलन शिरीष पोफळे तर आभार प्रदर्शन उमाताई व्यास यांनी केले . या कार्यक्रमास डॉ. ज्योत्स्नाताई कुकडे , शरदचंद्र परचुरे , भारतीय स्त्री शक्ती , मानिनी महिला मंडळ , बालकाश्रम ,जेष्ठ नागरिक संघ , एसओएस बालग्रामच्या प्रतिनिधींसह महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती .