मानाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक.मानाच्या लातूर /प्रतिनिधी :ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली . सिद्धेश्वर यात्रेत मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची मिरवणूक हे आकर्षण असते. गौरीशंकर मंदिरापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढली जाते. परंपरेनुसार गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मानाच्या काठीचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीस प्रारंभ होतो . यावर्षीही माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे
अध्यक्ष विक्रम तात्या गोजमगुंडे ,विशाल गोजमगुंडे आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी विधीयुक्त पूजन करण्यात आले . विक्रम गोजमगुंडे हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत तर विक्रांत गोजमगुंडे यांना काही महिन्यांपूर्वीच महापौर पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे देवस्थानचे अध्यक्ष आणि श…